स्वारगेटच्या बसस्थानकात सकाळी तरुणीवर अत्याचार, संध्याकाळी सर्व 23 सुरक्षारक्षकांचं निलंबन!
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर राज्य सरकारकडून 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलंय.
स्वारगेट बसस्थानक परिसरात मंगळवारी पहाटे एका महिलेवर अज्ञात व्यक्तीकडून अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख ( सहाय्यक वाहतूक अधिक्षक) व आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय चौकशी करून दोष आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे. असे निर्देश उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी ) श्री. विवेक भीमनराव यांना दिले आहेत. तसेच एकूणच महिला प्रवाशांच्या सुरक्षे संदर्भात आढावा घेण्यासाठी उद्या एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलाविण्याचे निर्देश देखील मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.
मंगळवारी पहाटे स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही एसटी बस मध्ये एका महिलेवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली. यासंदर्भात संबंधित महिलेने स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सदर घटनेची परिवहन मंत्री श्री . प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित बसस्थानकावरील त्या वेळी कर्तव्य असलेल्या स्थानक प्रमुख तसेच त्या आगाराचे प्रमुख यांची या प्रकरणी प्रवाशांच्या सुरक्षा संदर्भात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल विभागनिहाय चौकशी करावी, त्या चौकशीमध्ये ते दोष आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करावे असे निर्देश दिले आहेत. तसेच या बसस्थांनकावर कार्यरत असलेले सर्व सुरक्षा रक्षक यांना तात्काळ बदलण्यात यावे, तसेच त्यांच्या ऐवजी दुसऱ्या सुरक्षा रक्षकांना नेमण्याची मागणी संबंधित सुरक्षा मंडळाला करावी. असे निर्देश दिले आहेत.
याबरोबरच या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पुढील ७ दिवसात आपणास सादर करावा अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी ) श्री. विवेक भिमानवार यांना दिल्या आहेत. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य सध्या ” महिला सन्मान योजने ” अंतर्गत महिलांना त्यांच्या प्रवास तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे महिलांची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबरोबरच त्यांची सुरक्षितता हा देखील मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. स्वारगेट बसस्थानक वरील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी उद्या महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावली आहे. यामध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षा रक्षक यांचे तात्काळ निलंबन करण्यात आलंय. उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. तर स्वारगेट डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांचे चौकशी करून एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे. परिवहन आयुक्तांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर कारवाईचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, पुण्यातील स्वारगेट स्थानकावर रात्रभर प्रवाशांची गर्दी असते. वर्दळ असलेल्या या तरुणीवर अत्याचार झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आरोपी दत्तात्रय गाडे याने फलटणकडे जात असलेल्या तरुणीला सोलापूरला जाणारी गाडी फलटणलाच जात असल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर तरुणी बसमध्ये गेल्यानंतर दार लावून अत्याचार केला. दरम्यान, घटनेनंतर संपूर्ण राज्यातील संताप व्यक्त करण्यात येतोय.
स्वारगेट डेपो मधील 23 सुरक्षा रक्षक यांचे तत्काळ निलंबन
उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश तर स्वारगेट डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांचे चौकशी करून एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर केला जाणार परिवहन आयुक्तांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर कारवाईचा निर्णय होणार.
नेमकी घटना काय?
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका 26 वर्षांच्या तरुणीवर अत्याचाराची घटना घडली आहे. नराधमाने चक्क बसमध्ये हा अत्याचार केला आहे. मंगळवारी पहाटे 5.30 वाजता ही घटना घडली. दत्तात्रय गाडे असं या अत्याचार करणाऱ्या नराधमाचं नाव आहे.
पोलीस सध्यात त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. अत्याचार केल्यानंतर आरोपीने तरुणीला जीवे मारण्याचीही धमकी दिली. या घटनेची कोणाकडे वाच्यता केली तर जीवे मारीन असे हा आरोपी पीडित तरुणीला म्हणाला होता. त्यानंतर घडलेला हा सर्व प्रकार पीडित तरुणीने मित्राला सांगितल्यानंतर हा सर्व प्रकार उजेडात आला.
स्थायी समिती सदस्य पद द्यायला 25 लाख! नीलम गोऱ्हेंनंतर शिंदे गटाच्या पुणे शहराध्यक्षांचा गंभीर स्थायी समितीच्या सदस्य पदासाठी, काही नगरसेवकांना किती फंड द्यावा लागत आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
