लक्ष्मण उतेकर नावाच्या मराठी मनाने साकारलेलं शिवशंभू नावाचं कर्तृत्व- छावा
इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं ‘इतिहास विसरू शकत नाही” हाही एक इतिहास आहे. मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा इतका “तेजस्वी” आणि “ओजस्वी” इतिहास याच मातीत घडला, मात्रं मराठे त्यापासून बेदखल राहिले कि काय ? अत्यंत संवेदनशील हृदय असलेल्या मराठ्यांच्या संवेदना बोथट झाल्या की काय? अशी शंका अलीकडे येऊ लागली असतानाच श्री. लक्ष्मण उतेकर नावाच्या मराठी मनाने साकारलेलं शिवशंभू नावाचं कर्तृत्व ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपण मोठ्या संखेनं एकवटतो. एवढी एकचं गोष्ट तुमच्या आमच्या काळजामधे “राजा
शिवशंभू अजूनही जिवंत आहेत याचीच ती साक्ष.
इथल्या मातीचा एखादा ढेकूळ कधी हातात घेतला तो पाण्यात टाकला तरं पाण्यावरं जो तरंग उठेल तो तरंग सुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. आजूबाजूच्या सह्याद्रिची उंची वाढली ती उगाच नाही या सह्याद्रीच्या पायाखाली काहीजणांनी स्वतःला गाडून घेतलयं तेव्हा तो सह्याद्री आसमानाशी स्पर्धा करायला गेला.
सह्याद्रीची सैरं करणं कोणा एरा गैऱ्याच काम नाही. सह्याद्रीची सैरं फक्त तीघचं करू शकतात
पहिला”वाघ’ दुसरा “वारा आणि तिसरे” मराठे” या तिघांशिवाय सह्याद्री पेलनं कुणाला जमल नाही की साधल नाही. या सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आले ते “शिवराय” आणि “शंभूराय”
३५० वर्षापूर्वीचा जागरं आजही घडतोय इथं. “छत्रपती शिवाजी महाराजांचं” नाव कानांवर पडतं आणि आपल्या शरीरावरं रोमांच उठतात. “छत्रपती शिवाजी महाराज कि जय” अशी किल्कारी कुठं निनादते आणि शरीर पेटून उठतं. मनामनांमध्ये उर्मिजाप, निर्णाजाय, प्रेरणास्त्रोत तयार होतो. जणू काय आमच्या धमन्यातून सळसळनाऱ्या रक्ताच्या थेंबा-थेंबामध्ये तो “राजा शिवाजी” अजूनही जिवंत आहे जणू काय इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या भाळावरं इथली माती जन्मतःचं “शिवाजी” हे नाव कोरूनचं त्याला
जन्माला घेते कि काय अस सांगावं इतकी जादू या राजाची आहे. असं काय केलं असेल या राजानं
असं काय निर्माण करून
ठेवलं असेल ३५० वर्षानंतर जर शिवरायांचं नाव धेऊन आमचं शरीर पेटतं असेलं ३५० वर्षानंतर जर शिवरायांचं नाव घेऊन आम्हाला स्फूरणं चढतं असेलं तर ३५० ‘वर्षापूर्वी खुद्द शिवछत्रपतींच्या” कुशीत जन्माला आलेला “संभाजी राजा” कसा असेल
अरे कसा घडला असेलं..कसा उभा राहिला असेल..कसं असेल शौर्य…कसं असेल धैर्य..कसं असेल धाडस..कसं असेल साहस…कसा असेल अभिमान…कसा असेल स्वाभिमान…कसा असेल पराक्रम कसं असेल नेतृत्व, व्यक्तित्व, कर्तृत्व, कसे असतील छत्रपती संभाजी महाराज हेच लक्ष्मण उतेकर यांनी आपल्या छावा चित्रपटातून साकारलं आहे.
