महत्त्वाच्या बातम्या

पिरंदवणे निवईवाडी जि. प. शाळेत मराठी भाषा गौरव दिन संपन्न

         संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे निवईवाडी शाळेत मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कविता वाचन, आवांतर वाचन यांसह शब्दलेखन असे विविध उपक्रम राबविण्यात आले. ज्येष्ठ कवी व साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त पदवीधर शिक्षक योगेश मुळे व विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. पहिले मराठी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित, महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. इतकेच नव्हे मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. असे श्री. मुळे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
         सुभेदार प्रदीप चाळके चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ‘मराठी भाषा : राजभाषा संवर्धन’ या निबंधाच्या माध्यमातून मराठी भाषेप्रति असणारे आपले विचार मांडले. नंतर विविध भाषिक खेळ खेळून मराठी गौरव दिन उत्साहात साजरा केला. या दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी व शिक्षकांनी अभिजात मराठी साहित्य वाचण्याचा संकल्प केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!