महत्त्वाच्या बातम्या

मेढा येथे भव्य महिला दिन उत्सव ८ मार्चला

जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी  दिनांक आठ मार्च रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मेढा येथे माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराजसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला आहे.यावेळी महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराजसाहेब हे करणार आहेत.येथील कलश मंगल कार्यालय मेढा, एसटी डेपो समोर दुपारी ३.०० ते ६.०० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.यामध्ये तीन वाजता होम मिनिस्टर पैठणी आणि विविध खेळ स्पर्धा होनार आहेत. विविध प्रकारची बक्षीस ठेवण्यात आले आहे, याप्रसंगी खास आकर्षण झी मराठी फेम शरायू सोनावणे (पारू) ही अभिनेत्री सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहनार आहे. अशी माहिती भारतीय जनता पार्टी मेढा शहर याच्या वतीने नगरसेवक विकासजी देशपांडे व संयोजकांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!