देशसेवा करून निवृत्त झालेल्या सैनिकांना नेहमीच आदराचे स्थान मिळेल
देशासाठी सेवा करून निवृत्त झालेल्या सैनिकांना नेहमीच आदराचे स्थान मिळेल अशी ग्वाही सैनिक श्री. जालिंदर भिकू निकम यांचे सत्कार प्रसंगी अजिंक्यतारा साखर कारखान्याचे संचालक सुनिल निकम यांनी दिली.
अपशिंगे [मि] येथील सैनिक श्री. जालिंदर भिकू निकम पुणे येथील जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्स मधून 35 वर्षे देशसेवा करून निवृत्त झाले. याप्रसंगी त्यांच्या पत्नी सौ. शोभा जालिंदर निकम व श्री. जालिंदर निकम यांचा शूरवीर आजी-माजी सैनिक असोशिएशन अपशिंगे [मि], नातेवाईक ,समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
श्री. जालिंदर निकम यांचा कारगील युद्धात सहभाग होता. त्यांनी अरुणाचल, नागालैंड, छत्तीसगड,भुटान,मणीपुर ,सिक्किम या दुर्गम प्रदेशात देशसेवा केली. त्यांचे घराला सैनिकी वारसा असून त्याचे वडील कै. भिकु धोंडी निकम हे सुभेदर मेजर होते.
यावेळी सातारा पं.स.चे माजी सदस्य पृथ्वीराज निकम, जिल्हा तलाठी संघाचे माजी अध्यक्ष भास्करराव निकम, तानाजी जाधव ,कन्या सौ. रेश्मा यादव यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांचे जेष्ठ बंधू निवृत्त CRPF जवान श्री.दिलीप भिकू निकम यांनी सर्वांचे स्वागत केले. तर संघटनेचे अध्यक्ष सुभाष निकम यांनी आभार मानले.
यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन ज्ञानदेव पाटील , ग्रामपंचायत सदस्य मा.संतोष माने,कॅप्टन नारायण मोहिते, सुभेदार राजेंद्र श्री. निकम, सुभेदार अरुण निकम,सुभेदार संदीप निकम,युवा नेते हर्षल निकम, जोतिबा देवस्थानचे पुजारी श्री प्रकाश लादे, टी.एम निकम,आर. टी भाऊ, युवा उद्योजक अशोक वि.निकम, अमृत जाधव, रामकृष्ण निकम, तानाजी निकम, बाळासाहेब निकम, अनेक आजी माजी सैनिक, ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते.
