महत्त्वाच्या बातम्या

विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ठाकरे गटाचे नेते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत.

       राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये या निर्णयाला महत्त्व आहे, कारण विरोधी पक्षनेते हे सत्ताधारी पक्षाला प्रभावी विरोध करण्याच्या भूमिकेत असतात. भास्कर जाधव हे अनुभवी नेते असून, त्यांनी यापूर्वी विविध पदांवर काम केले आहे.यापूर्वी हे पद अजित पवारांकडे होते. मात्र, त्यांनी महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर विरोधी पक्षनेते पद रिक्त होते. ठाकरे गटाने आता भास्कर जाधव यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. लवकरच त्यांची अधिकृत नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!