महत्त्वाच्या बातम्या

तडवळे तालुका शिराळा येथे महिला दिन उत्साहात साजरा

शिराळा : ग्रामपंचायत तडवळे व जिल्हा परिषद शाळा, तडवळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजमाता जिजाबाई व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मा.अस्थिरोग तज्ञ डॉ.मनिषा यादव, सरपंच प्रियांका पाटील, प्रेरणा फाऊंडेशन शिराळाच्या प्रमुख सुमन गायकवाड, ग्रामविकास अधिकारी प्रभावती भोसले, सचिन पाटील, मुख्याध्यापक शिवाजी पाटील, शिक्षक मोहन पवार, समुदाय आरोग्य अधिकारी सायली आवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेत माता पालकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत  प्रथम क्रमांक भाग्यश्री पाटील, द्वितीय ज्योती गायकवाड, तृतीय वैशाली चव्हाण यांनी पटकवला. तर  लिंबू चमचा स्पर्धेमध्ये  प्रथम गौरवी पाटील, द्वितीय अश्विनी सुतार, तृतीय शितल माने यांनी मिळवला  संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा देखील घेण्यात आल्या. महिलांनी उज्वल यश संपादन केले त्याबद्दल त्यांचा बुके, पेन व वही देऊन गौरव करण्यात आला.

      यावेळी डॉ यादव यांनी माता पालकांना प्रोत्साहन देणारे मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच प्रियांका पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रभावती भोसले, सायली आवळे, शिक्षिका गौरी गायकवाड, स्नेहल पाटील यांचाही सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!