शिराळा तालुक्याच्या विकासासाठी सत्यजित भाऊंची सातत्यपूर्ण धडपड!
शिराळा : अधिवेशनादरम्यान विविध संस्था सामाजिक संघटना सरकार ने आपल्या आंदोलनाची दखल घ्यावी एवढीच माफक अपेक्षा ठेऊन आझाद मैदानावर किवा मुंबईत आंदोलने उपोषण करत असतात.संबंधित मंत्री किवा अधिकारी ह्यांनी त्यांच्या काय मागण्या आहेत हे समजून घेऊन त्यावर कार्यवाही करायची असते.
ह्या अधिवेशन काळात मुंबईत विविध ठिकाणी जी उपोषण झाली त्या उपोषणाना सामाजिक जबाबदारीचे भान म्हणा किवा सत्ताधारी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून म्हणा आपले आमदार सत्यजित भाऊ देशमुख हे भेटी देत आहेत त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. आणि त्यांचे प्रश्न सरकार दरबारी विधी मंडळात मांडत आहेत.
नक्कीच मित्रानो ही भविष्यातील मोठ्या संधीचे शुभ संकेत आहेत.
भाऊंचा अभ्यास आणि तळमळ नक्कीच पक्ष बघतअसेल.आपल्या विधानसभा मतदारसंघाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच समाजातील घटकांच्या अडचणी भाऊ मांडत असल्याचेआपल्याला दिसून आले.
कापड कामगार,गिरणी कामगार,आशा सेविका, बांधकाम कामगार,मूर्तिकार,शेतकरी ,शिक्षण सेवक ह्या आणि अशा बऱ्याच प्रश्नांवर भाऊनी विधी मंडळात आवाज उठवला असून शिराळा तालुक्याचे दीर्घ काळ प्रलंबित प्रश्न आणि चांदोली पाटण संगमेश्वर पर्यटनाचा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक स्मारकाबरोबरच तालुक्यातील रस्ते,सौर ऊर्जा प्रकल्प,पोलिस स्टेशन,घन कचरा व्यवस्थापन ह्या सारख्या विषयांना त्यांनी हात घातला.
वाकुर्दे बुद्रुक योजना आणि वारणा डाव्या कालव्याला मोठा निधी खेचून आणला.शिराळा नगरपंचायतीला अग्निशामक वाहन आणले.पेठ नेर्ले भागाचा पाण्याचा प्रश्न विधिमंडळात अधोरेखित केला.नाटोली सारख्या गावात सौर उर्जा प्रकल्प उभरावा अशी मागणी केली.
गेल्या महिनाभरात झालेल्या महसूल,ग्रामविकास,एस टी महामंडळ आणि आरोग्य विभागाच्या आढावा बैठक असो किवा मग प्रदीर्घ काळानंतर झालेल्या उर्जामित्र बैठक आणि जल जीवन मिशन च्या अपुर्या कामांचा आढावा घेणारी बैठक असो ह्या सर्व गोष्टीवरून सत्यजित भाऊंचा कामाचा आवाका,गती आणि प्रशासनावर असणारा आदरयुक्त दरारा दिसून येतो.
निश्चितच तालुक्याचा विकासाचा रथ योग्य हातात आला असून शिराळा विधानसभा मतदारसंघाला गतवैभव पुन्हा प्राप्त झाल्या शिवाय राहणार नाही.भाऊंचे काम बघून निश्चितच तालुक्याला पुन्हा एकदा लाल दिवा मिळेल आणि आपल्या भाऊंचा आमदार भाऊ ते नामदार भाऊ असा नामोल्लेख आपल्याला करावा लागेल असवाटतंय .
