आझाद चौकातील फर्निचर मार्केटला भीषण आग, १५ हून अधिक दुकाने जळून खाक
छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकामध्ये असलेल्या फर्निचर बाजारात मोठी आग लागली. या आगीत सुमारे १० ते १५ दुकाने जळून खाक झाली आहेत.
सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही, तसेच जीवितहानी टळली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून व्यापाऱ्यांवर मोठा आर्थिक फटका बसला आहे. अधिकाऱ्यांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.
