महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीत १३ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन – २२ आणि २३ मार्चला आयोजन

शिर्डी येथे येत्या २२ आणि २३ मार्च रोजी १३ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन भव्य स्वरूपात आयोजित केले जाणार आहे. या संमेलनात परिसंवाद, कीर्तन, भारुड, अभंगवाणी यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी भव्य दिंडी सोहळा स्पर्धा होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी संत साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली.

    महाराष्ट्र ही संत, शूर वीर आणि समाजसुधारकांची भूमी आहे. येथेच ११ नोव्हेंबर २०११ रोजी वारकरी साहित्य परिषदेची स्थापना झाली. या संस्थेमार्फत दरवर्षी अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील थोर संत आणि समाजसुधारक यांच्या विचारांचा प्रचार आणि समाजाला योग्य दिशा देणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.

     या संमेलनात वारकरी संप्रदाय, महानुभव पंथ, नाथ संप्रदाय, रामदासी संप्रदाय यांसारख्या विविध संत परंपरांवर सखोल विचारमंथन होणार आहे. या संमेलनामुळे समाजाला संत साहित्याची महती पटेल तसेच संतांच्या विचारांद्वारे सकारात्मक दिशा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!