यशवंत शेतकरी गट पिंपरी यांना रु. पाच लाखाचे बक्षीस जाहीर
पाणी फाउंडेशन आयोजित फार्मर कप 2024 स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली. या वेळी राज्यांमधून उत्कृष्ट काम केलेल्या शेतकऱ्यानं गौरविण्यात आले. सातारा जिल्ह्यामधून एकमेव कुमारी निशिगंधा भारत सातपुते यांना भन्नाट युवा शेतकरी म्हणून गौरविण्यात आले .या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यांमधून एकूण 4360 शेतकरी गटांनी सहभाग घेतला होता. यासाठी पानी फाउंडेशन ने घालून दिलेल्या नियमानुसार या सर्वांनी पिक पद्धतीचा अवलंब केला. विविध तांत्रिक व मौखिक परीक्षांमधून सुरुवातीस राज्यांमधून 300 शेतकरी गटांची निवड केली व यामधून राज्यस्तरीय परीक्षांसाठी 25 सर्वोत्तम शेतकरी गट निवडले. यामध्ये यशवंत शेतकरी गट पिंपरी यांचा समावेश आहे.
या गटामधून महिला शेतकरी गट व पुरुष शेतकरी गट यांना अनुक्रमे एक ते तीन नंबर देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री श्री. माणिकराव कोकाटे, अभिनेते आमिर खान, किरण राव, सत्यजीत भटकळ, अविनाश पोळ, पोपटराव पवार, सह्याद्री एग्रोचे विलास शिंदे, एबीपी माझा चे राजीव खांडेकर, कृषी विभागाचे सचिव, कृषी आयुक्त, सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, जितेंद्र जोशी, त्याचप्रमाणे सिने सृष्टीतील अनेक मंडळी आणि अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात हजर होता. गटामध्ये चंद्रकांत शिलवंत, मा. सरपंच, तुळशीराम राजगे, विश्वंभर गायकवाड, आबासो राजगे, बबन गायकवाड, नेताजी राजगे, बलभीम राजगे, श्रीरंग ढवळे, कैलास पाटील, भारत शिंदे, निशिगंधा सातपुते, अण्णा सातपुते , किरण महानवर, सुहास अर्जुन, नानासाहेब राजगे, दादा करे, राहुल लक्ष्मण राजगे इत्यादी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला व मुख्यमंत्री महोदय यांनी रु पाच लाख बक्षीस जाहीर केले त्याबद्दल आनंद व्यक्त केला. याकामी पानी फाउंडेशन चे सुखदेव भोसले, दयानंद निकम, जितेंद्र फडतरे व ऋतुजा चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
