महत्त्वाच्या बातम्या

महामार्गालगतच्या वटवृक्षाला जीवदान; पर्यावरण शिक्षक, विद्यार्थी व देवराईच्या प्रयत्नांना यश

भुईंज: पेटणारा वटवृक्ष शिक्षकांच्या प्रसंगावधाना मुळे वाचला.सयाजी शिंदे यांचे देवराई व सावकार इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी मदतीला धावून गेले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजन्याच्या दरम्यान रामनगर ते सावकार इंजिनिअरिंग कॉलेज या रस्त्यावर बाजूला असलेल्या वटवृक्षाच्या बुडाक्यात अचानक पेटलेल्या ज्वाळा दिसू लागल्या व धुराचे लोट सुरू झाले. याच वेळी रस्त्यावरून विरमाडे कडे जाणारे शिक्षक प्रकाश सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत माती टाकून आग विजवण्याचा प्रयत्न केला.  रस्त्यावरून जाणाऱ्या सावकार इंजिनिअरिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यांना मदतीला बोलवले व त्यांनी सॅक मधील पाण्याचा बाटली काढून आग विजवण्यास सुरुवात केली. पण आग नियंत्रण न होता वाढत राहिली त्यावेळी शिक्षक प्रकाश सोनवणे यांनी सयाजी शिंदे यांच्याशी संपर्क साधत अग्निशमन यंत्रणा पाठवा असे सांगितले त्यावर सयाजी शिंदे यांचे देवराई चे कार्यकर्ते व सातारा नगरपालिका अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली व आग विजवली. दरम्यान  सायंकाळी 7 वाजेपर्यंत आग विजवण्यासाठी धडपडणाऱ्या शिक्षक प्रकाश सोनवणे व विद्यार्थ्यांनी यांचे अनेक पर्यावरण प्रेमींनी कौतुक करीत धन्यवाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!