भारतीय न्यायव्यवस्थेतील न्यायदेवतेच्या मूर्तित बदल
भारतीय न्यायाधीशांच्या लायब्ररी मध्ये नवीन स्वरूपाचा पुतळा बसवण्यात आला आहे. भारतीय न्यायव्यवस्थेचे प्रतिक असलेल्या न्यायदेवतेच्या पुतळ्याच्या डोळ्यावरील पट्टी हटवण्यात आली आहे. तसेच एका हातात तलवार होती त्या जागी आता संविधान दिसत आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पुढाकाराने हा पुतळा बसवण्यात आला आहे.
न्यायदेवता जीला आपण न्यायालयात पाहत आलेलो आहे ती खरे म्हणजे युनान ची देवी आहे.तिचे नाव जस्टीया आहे आणि त्यावरून जस्टीस हा शब्द आला. आधीच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असायची याचा अर्थ न्याय नेहमी निपक्षपणे असावा.17 व्या शतकात एक इंग्रज अधिकारी प्रथम या मूर्तीस भारतात घेऊन आला.तो न्यायालयातील एक अधिकारी होता. 18 व्या शतकात जेव्हा भारतात ब्रिटिशांची सत्ता होती तेव्हा पासून न्यायदेवतेच्या मूर्तीचा सार्वजनिक स्वरुपात उपयोग केला जाऊ लागला.भरतास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण या प्रतिकास अवलंबले.
न्यायदेवतेच्या नवीन पुतळ्याचे स्वरूप पारंपरिक पुतळ्यापेक्षा वेगळं आहे. न्यायदेवतेचा नवीन पुतळा हा न्याय आंधळा नाही असा स्पष्ट संदेश देत आहे असे सांगितले जात आहे. नवीन पुतळ्यामध्ये तराजू तसाच असून तो अजूनही न्यायाचे प्रतिक बनलेला आहे
