आ.सत्यजित देशमुख यांनी दिल्ली येथे घेतली अमित शहांची भेट
सांगली: शिराळा तालुक्याचे आमदार व हातकणंगलेचे खासदार नवी दिल्ली येथे आज आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितजी शहा यांची भेट घेवून जगप्रसिद्ध असणाऱ्या शिराळा नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावे, नागपंचमी दिवशी जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी, यासाठी केंद्र सरकार ने वन्यजीव कायद्यामध्ये खास बाब म्हणून सुधारणा करावी अशी मागणी केली. त्याच बरोबर शिराळा विधानसभा मतदार संघातील अनेक महत्वपूर्ण प्रकल्पा बाबत, विकासात्मक कामाबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.
