महत्त्वाच्या बातम्या

1200 कोटीच्या घोटाळाप्रकरणी IPS भाग्यश्री नवटाकेंची CBI कडून चौकशी 

 
         पुणे पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध फसवणूक केल्या बद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवटाकेंनी 1200 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाचे नेतृत्व त्यांनी केले होते व आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर आहे. 
        जळगाव मधील भाईचंद हिराचंद  रायसोनी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात संशयित आरोपी सुनील झंवर व कुणाल शाह यांनी पोलीस महासंचालकाकडे तक्रार केली व तक्रार अर्जावरून भाग्यश्री नवटाके विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास सीबीआय कडे सोपविण्यात आला आहे. फिक्स डिपॉसिटवर उच्च परतावा देऊन व्यक्तींची फसवणूक केल्या प्रकरणी हा घोटाळा केंद्रित आहे. CID च्या अहवालानुसार गंभीर प्रक्रियात्मक त्रुटी दर्शवल्या आहेत. जसे की शरीरिक उपस्थिती नसलेल्या तक्रार कर्त्यांच्या बनावट सह्या ,एका दिवसात एकाच गुन्ह्याच्या क्रमांकाखाली अनेक प्रकरणे दाखल करणे अशा गैरप्रकारामुळे त्यांच्यावर कलम 474 (बनावट कागदपत्रे बाळगणे) कलम 466 ( बनावट ) आणि कलम 120 बी (गुन्हेगारी कट) यासह भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमाखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. 2015 च्या घोटाळ्यातील तिच्या भूमिकेबद्दल अधिकाऱ्यांचा अधिक तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!