महत्त्वाच्या बातम्या

गॅस दरवाढी विरोधात साताऱ्यात चुलीवर भाकरी थापो आंदोलन

   सातारा: केंद्र सरकारने घरगुती सिलेंडर वापराच्या किमतीत पन्नास रुपयाची अचानक वाढ केल्यानंतर काँग्रेस महिला आघाडी आक्रमक झाली आहे.  सातारा येथील पोवई नाक्यावर भर चौकात चुलीवर भाकरी थापून गॅस दरवाढीचा  अनोख्या पद्धतीने आंदोलन केले व गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला.
         लाडक्या बहिणीच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम महाराष्ट्र सरकारने केले आहे असे सुषमा राजे घोरपडे यांनी सांगितले. गॅसची किंमत पन्नास रुपयांनी वाढवायची नंतर दहा दिवसांनी दहा रुपये कमी करून महिलांची फसवणूक करायचा उद्योग सरकारकडून होत आहे. या मोर्चामध्ये प्राची ताकतोडे, वृषाली जाधव, विजय मोरे, अरबाज शेख, आशा साळुंखे,  कांताताई साळुंखे, रोहिणी यादव, धनश्री मालुसरे, अंजली कांबळे, मोहनराजे घोरपडे, श्रीकांत कांबळे, नंदकुमार खामकर इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!