महत्त्वाच्या बातम्या

भुईंज पोलीस स्टेशन हद्दीतील तब्बल 16 डीपी चोरीचे गुन्हे तात्काळ उघड

भुईंज: भुईंज पोलीस स्टेशन हद्दीतील तब्बल 16 डीपी चोरीचे गुन्हे तात्काळ उघड केल्याने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी रोख 25000 बक्षीस देऊन भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व गुन्हे प्रकटीकरण शाखा भुईंज यांचा सन्मान केला. दरम्यान शेती लाईट वरील डीपी चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून भुईंज पोलिसांनी पकडलेल्या चोरांमुळे डीपी चोरीचे प्रमाण नक्कीच कमी होईल या कारवाई मुळे वाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी सपोनी रमेश गर्जे व टीमचे अभिनंदन  केले. 
      भुईंज ता. वाई येथील भुईंज पोलीस स्टेशन हद्दीतील शेतीवरील तब्बल सोळा डीपीवर या वर्षात चोरट्यांनी डल्ला मारला होता मात्र यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन शेतीला पाणीच बंद झाले होते व पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हायवे वरील डिझेल चोरी, मोटरसायकल चोरी, या गुन्ह्यांची दखल घेत पोलीस स्टेशनचे सपोनी रमेश गर्जे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंगराव पाटील, नितीन जाधव, वैभव टकले, ज्ञानदेव राजे,सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर यांनी या चोरीची तात्काळ दखल घेत हायवे वर होणारी डिझेल चोरी व मोटरसायकल चोरी याचा छडा लावत चोरट्यांना जेरबंद करण्यात त्यांना यश मिळवले. 
       सपोनी रमेश गर्जे व त्यांच्या टीमने सोळा डीपी चोरी, पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उभ्या वाहनांमधून डिझेल चोरी, व मोटरसायकल चोरी अनेक गुन्हे उघडकीस आणले हे कर्तव्यदक्ष केलेले काम कौतुकास्पद असून महत्वाचे डीपी चोर पकडले हे शेतकरी वर्गासाठी दिलासा देणारे ठरलेले आहेत याचीच दखल घेत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी सपोनी रमेश गर्जे व टीमला 25 हजाराचे रोख बक्षीस देऊन सन्मान केला.  भुईंज पोलिसांनी केलेल्या या चांगल्या कामगिरीबद्दल शेतकरी वर्गाने रमेश गर्जे व टिमचे अभिनंदन करीत कौतुक सुद्धा केले आहे.

          भुईंज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रमेश गर्जे यांची काम करण्याची पद्धत ही कौतुकास्पद असून ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं त्या त्या ठिकाणी तात्काळ गुन्हे उकल करण्यात त्यांना यश आले आहे त्यामुळेच रमेश गर्जे ज्या ठिकाणी कार्यभार स्वीकारतात त्या ठिकाणी चोरांच्या मुस्क्या ह्या आवळल्या जातातच व तेथील क्राईम रेट सुद्धा कमी होतो. त्यांच्या याच कामगिरी व कर्तव्यदक्षपणा आणि आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर अशी असंख्य बक्षीसे व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा वरिष्ठांकडून सन्मान झालेला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!