महत्त्वाच्या बातम्या

संभाजीराजेंच्या स्वराज्य कडे विधानसभेसाठी जोरदार इनकमिंग 

तीन जिल्हाप्रमुख, तीन माजी महापौर, सहा जिल्हापरिषद सदस्य, एक जिल्हापरिषद सभापती, एक पंचायत समिती सभापती सोबत आपचा युवक प्रदेशाध्यक्ष प्रवेशासह उमेदवारी साठी आग्रही आहे.परिवर्तन महाशक्ती म्हणत संभाजीराजे , बच्चू कडू, राजू शेट्टी यांनी दिलेल्या तिसऱ्या पर्यायावर उमेदवार संधी घेण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. 

काल दिवसभरात संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाचे पुण्यातील मध्यवर्ती स्वराज्य भवन या कार्यालयात स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे, सरचिटणीस धनंजय जाधव, आप्पासाहेब कुढेकर , प्रशांत पाटणे , विनोद साबळे यांनी मुलाखती घेतल्या. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार जिल्हाप्रमुख नांदेड विश्वंभर पवार यांच्यासह इतर जिल्ह्यातील, शिवसेना शिंदे जिल्हाप्रमुख , शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख,आम आदमी पक्ष जिल्हाप्रमुख या पक्षांचे प्रत्येकी एक असे चार जिल्हाप्रमुख संभाजीराजेंना उमेदवारी साठी मुलाखती देण्यास आले होते.
       तसेच नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांच्यासह इतर शहरातील तीन माजी महापौर उमेदवारी साठी भेटुन गेले आहेत.भाजपचे दोन जिल्हा परिषद सदस्यपद व एक जिल्हापरिषद सभापती , शिवसेनेचे दोन जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादीचे दोन जिल्हा परिषद सदस्य उमेदवार मागण्यासाठी स्वराज्य भवनात आले होते.भुम परंडा मतदारसंघातील – सहकार क्षेत्रातील मोठे स्वराज्य च्या वाटेवर आहे.

              आम आदमी पक्ष केजरीवाल यांच्या पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांनी देखील संभाजीराजे यांची भेट घेऊन उमेदवारी ची मागणी केली आहे.खेड राजगुरूनगर पंचायत समितीचे मा सभापती अंकुश राक्षे यांनी देखील उमेदवारी मागण्यासाठी स्वराज्य भवनात राजेंची भेट घेतली. सर्वच पक्षांचे तालुका प्रमुख व नगरसेवक देखील प्रवेशासाठी स्वराज्य भवनात दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!