पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; पुणेकरांना दिलासा
राज्यात सर्वत्रच तापमान वाढलेले असताना पुणेकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे.मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ते एप्रिलच्या पूर्ण महिन्याभर पुण्यातील तापमान वाढले होते. काही दिवसांपासून पुण्यातील तापमानात मोठी घसरण झाली असुन आज दुपारी पुण्यातील अनेक भागामध्ये पावसाने हजेरी लावली.त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.हवामान विभागाने आजपासून पुढचे तीन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली होती.तापमानात घट झाल्याने हवामानात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.शहरातील सिंहगड रस्ता, कोथरूड, फर्ग्युसन कॉलेज रोड, हडपसर, आणि बाणेर परिसरात पावसाचे जोरदार सरी कोसळल्याची माहिती मिळाली आहे.
