महत्त्वाच्या बातम्या

राज्याचे मा. ग्रामीणविकास मंत्री, मा. खासदार प्रतापराव भोसले यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन

भुईंज : लोककारणासाठी आपले तत्व व स्पटीकत्व जपत आपले. आयुष्य एखाद्या ग्रंथाप्रमाणे नव्या पिढीला आदर्श म्हणून वास्तुपाठ देणारे दिवंगत प्रतापरावभाऊ भोसले हे राजकारणालाही नवी उंची देणारे लोकपुरूष होते. त्यांच्याकडे सर्वच क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणून पाहिले गेले हा इथल्या मातीचा मोठेपणा आहे, असे प्रतिपादन कीर्तनकार ह.भ. प. प्रमोद महाराज जगताप यांनी केले.राज्याचे माजी ग्रामीणविकास मंत्री, माजी खासदार प्रतापराव भोसले यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते.

      हभप प्रमोद महाराज म्हणाले, या सातारा जिल्ह्याने महाराष्ट्र राज्याला व देशाला अनेक दिगग्ज व्यक्तिमत्त्व दिली. अशापैकीचं राजकीय क्षेत्रात प्रतापराव भोसले हे आदर्शस्थानी असलेले व स्पटीकाप्रमाणे चरित्र आणि चारित्र्य जपलेले हे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होत. पुढच्या येणाऱ्या अनेक पिढीला दीपस्तंभ प्रमाणे ऊर्जा देईल असेही ते म्हणाले. यावेळी माजी आमदार मदनदादा भोसले, मोहनराव भोसले, गजानन भोसले, हभप चंद्रकांत उदावंत महाराज यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!