अपशिंगे मिलिटरी गावाला ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार
झी २४ तासच्या ‘महाराष्ट्र रत्न २०२५’ सोहळ्यात मिलट्री अपशिंगे या गावाला मानाचा ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अपशिंगे गावाने देशाला अनेक शूरवीर जवान दिले आहेत, ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. या गावाची सैनिकी परंपरा आजही कायम आहे आणि इथला प्रत्येक तरुण देशसेवेसाठी तत्पर असतो. याच अतुलनीय योगदानामुळे आज अपशिंगे गावाला हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला व त्यांनी आपल्या भाषणात गावाच्या शौर्याची गाथा सांगितली आणि गावाला भेट देऊन विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले, याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
