महत्त्वाच्या बातम्या

घराच्या बाहेर होते तब्बल 30 साप….लोकांची पळता भुई थोडी

       उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील शाहबाद एसडीएम कॉलनीमधून एक धक्कादायक  घटना समोर आली आहे. दुपारच्या सुमारास एका घराच्या पायरीखालून अचानक तब्बल सापांची 30 पिल्ले आणि त्यांच्यासोबत एक मोठा साप बाहेर काढण्यात आला.घराजवळ काहीतरी विचित्र हालचाल होत असल्याचे पाहून परिसरातील लोकांनी तात्काळ ॲनिमल केअर फाउंडेशनला याची माहिती दिली.सर्पमित्र सिंटू  घटनास्थळी पोहोचले व त्यांनी कोणताही विलंब न लावता सर्व सापांना सुरक्षितपणे पकडले व जंगलात सोडून दिले. सर्प मित्राने दिलेल्या माहिती नुसार,  हे पाण्यात राहणारे ‘चेकर्ड कीलबॅक’ जातीचे साप होते. हे साप विषारी नसतात, पण त्यांच्या चाव्यामुळे खूप वेदना आणि सूज येऊ शकते.  साप पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!