महत्त्वाच्या बातम्या

श्री महंत शांतिगिरी पतसंस्थेच्या चेअरमन पदी श्री महंत शांतिगिरीजी महाराज तर व्हाईस चेअरमन पदी दादा जगदाळे 

   मलवडी (ता. माण )येथील सर्वसामान्यांची अर्थवाहिनी असणाऱ्या श्री महंत शांतिगिरी जी महाराज ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. दरम्यान चेअरमनपदी महंत शांतिगिरीजी महाराज तर व्हाइस चेअरमनपदी दादा सुरेश जगदाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

         बिनविरोध झालेल्या या संस्थेच्या सदस्य पदी  सुदाम बोराटे,  श्रीकांत कदम , एडवोकेट संजय जगन्नाथ शिंदे , रवींद्र मगर , शंकर जगदाळे , दादासो शामराव जगदाळे, सौ. रूपाली गोरे, हेमलता मगर, यांची निवड झाली.  ही पतसंस्था गेली 20 वर्षे सहकार्यातून सत्कार्याकडे हे ब्रीद घेऊन आदरणीय बाबाजींच्या मार्गदर्शनाने ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहे संस्थेच्या माध्यमातून सामान्यजणांच्या प्रगतीस हातभार लागला आहे.  श्रीमती सुषमा शिंदे सहा. निबंधक माण. यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री. तानाजी कदम व संस्थेचे सर्व सेवक वृंद यांनी सर्व सभासद, ग्राहक व हितचिंतक यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!