महत्त्वाच्या बातम्या

बोडकेत खुणाचा प्रयत्न,सहा जणांवर गुन्हा दाखल ;२४ तासांत दहिवडी पोलिसांकडून आरोपी अटकेत 

 बोडके (ता. माण ) येथे बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घोडा नाचवीण्याच्या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याकडून एकास जीवे मारण्याची घटना घडला. सदर घटनेचा दहिवडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

          पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत शिवाजी जाधव, (वय २६) रा. बोडके हे आपले मित्र प्रवीण जाधव,शशिकांत जाधव, सागर जाधव, किरण जाधव यांच्यासोबत बोडके पाटी येथे उभे राहिले असताना १० जणांच्या टोळक्याने येऊन घोडा नाचवीण्याचे कारण पुढे करत शिवीगाळ केली व  लोखंडी रॉड, काठीने जोरदार मारहाण केली. याप्रकरणी रणजीत बुधावले (रा. खातगुण),अमित दिलीप जाधव(रा. वडूज) , अविष्कार सचिन मदने(रा. बिदाल), रोहित जयवंत आवळे(रा. डिस्कळ ), इरफान मुलाणी(रा. विसापूर ),रियाज पठाण(रा. डिस्कळ )व इतर अनोळखी पाच जणांविरोधात दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

 

२४ तासांत ६ जणांना अटक 

    या गुन्हाच्या तपासात गोपनीय बातमीदारमार्फत माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, चांदनी मोठे, हवालदार गाढवे, नितीन धुमाळ, निलेश कुदळे सुधीर करचे, मल्हारी खाडे यांनी मोठ्या शिताफिने अटक केली आहे.सदर गुन्हाचा पुढील तपास दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!