महत्त्वाच्या बातम्या

मुंबई गोवा महामार्गावर मिनी बस व एलपीजी गॅस टँकरचा भीषण अपघात; 29 शिक्षक जखमी

       मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी भीषण अपघात झाला आहे. रत्नागिरीतल्या निवळी येथे सकाळी 7.45 वाजता एलपीजी टँकर आणि मिनी बसचा अपघात झाला. यामध्ये  एक चालक आणि  29 शिक्षक   जखमी झाले आहेत.मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक गेल्या 5 तासांपासून ठप्प आहे. बस आणि टँकर ची धडक होताच टँकर मधून गॅस गळती सुरु झाली. यामुळे अनेक गाड्यांनी पेट घेतला. त्याचबरोबर  बाव नदी पूल वरील आजूबाजूची घरे देखील जळून खाक झाली आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये 16 महिला व 14 पुरुषांचा समावेश आहे. हे सर्व जण प्रशिक्षणासाठी निघाले होते.

      जखमींना जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे तात्काळ दाखल करण्यात आले. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून गोव्यावरून येणारी वाहतूक पाली आणि उक्षी मार्गे वळवली तर मुंबईहुन गोव्याकडे जाणारी वाहतूक संगमेश्वरमार्गे वळवण्यात आली. घटनास्थळी तज्ञांची टीम दाखल झाली असून अपघातात  पलटी झालेल्या टँकरमधून गॅस काढून वाहतूक पूर्ववत केली जाईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!