महत्त्वाच्या बातम्या

१७ वर्षीय तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू 

       पळशी (ता. माण ) येथील एका १७ वर्षीय तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना पळशी माळीखोरा शिवारात घडली.अदिती धनाजी देवकुळे असे मृत तरुणीचे नाव आहे.याबाबत म्हसवड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दि.9 जून 2025 रोजी सकाळी 7.00 वा.चे पुर्वी पळशी ता.माण येथील माळीखोरा येथील भोगल्याचे शिवारात असलेल्या विहिरीत अदिती धनाजी देवकुळे वय 17 वर्षे रा. पळशी माळीखोरा ही विहीरीतील पाण्यात पडुन बुडुन मयत झाली आहे. अशी तक्रार महादेव धर्मा देवकुळे रा.पळशी यांनी म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.

 या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस हवालदार डि.पी‌.खाडे यांनी सहकार्यासह घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून म्हसवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

          सदर घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डि.पी.खाडे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!