महत्त्वाच्या बातम्या

वारी मार्गावरील विविध ठिकाणी भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन

       महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून लाखो भाविक पंढरीच्या वारीत सहभागी होत असतात. विठू नामाचा गजर करत, पालखी, टाळ, मृदूंगाच्या तालात मग्न होऊन पंढरपूर या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचतात. या दिंडी दरम्यान अनेक वृद्ध वारकऱ्यांना काही शारीरिक त्रास होऊ नये त्यासाठी वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष व छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा यांच्या समन्वयाने श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी एकादशी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी सातारा जिल्ह्यामधील लोणंद, तरडगाव, फलटण व बरड या मुक्कामी ठिकाणी विविध आरोग्य सेवा पुरविल्या जाणार आहेत.

     आरोग्य शिबीर २६ जून  ते  २९ जून २०२५ असे चार दिवस आयोजित करण्यात आले आहे.  यामध्ये केंद्र शासन व राज्य शासन पुरस्कृत विविध आरोग्य योजनांबाबत जनप्रबोधन केले जाणार आहे. तसेच नेत्र तपासणी, दंतचिकित्सा, शल्यचिकित्सा, अस्थिरोग चिकित्सा, निदानात्मक, उपचारात्मक सोयीसुविधा, औषध पुरवठा व चरण सेवा (फिजिओथेरपी सर्विसेस) इत्यादी भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सेवांचा भाविकांनी  लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महावि‌द्यालय व रुग्णालयाचे  अधिष्ठाता डॉ. विनायक काळे  यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!