महत्त्वाच्या बातम्या

पुणे शहर परिसरात दीडशेहून अधिक घरफोडी ; सराईत गुंड सीसीटीव्हीत कैद

       पुणे शहरात सराईत चोरांचे प्रमाण वाढले असून कोंढवा पोलिसांनी 150 पेक्षाही जास्त   घरफोडी करणाऱ्या सराईत गुंडाला अटक केली आहे. आरोपीकडून 3 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अर्जुनसिंग राजपूत सिंग दुधानी (वय 47) रा मांजरीगांव हडपसर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून,सलग पाच दिवस सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी सापळा रचून त्याला गजाआड केले आहे. 4 जून रोजी कोंढवा परिसरात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, 21 तोळे सोने, सोसायटीतील सीसीटीव्हीचा डिव्हीआर चोरून नेला होता.याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

       या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी दोन विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली होती. तपास पथकातील सहाय्यक निरीक्षक राकेश जाधव, पोलिस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे,पोलिस अंमलदार सतीश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, सुजित मदन, सुरज शुक्ला, अभिजित जाधव, गोरखनाथ चिनके, लक्ष्मण होळकर, विकास मरगळे, संतोष बनसूडे,सैफ पठाण यांनी उत्तम कामगिरी बजावत सापळा रचून आरोपीस अटक केले.
        परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर, सहाय्यक आयुक्त धन्यकुमार गोडसे, पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!