महत्त्वाच्या बातम्या

लेखी आश्वासनानंतर  शिंगणापूर ग्रामस्थांचे उपोषण मागे

    शिंगणापूर येथील गावठाण व गायरानात बांधलेली घरे नियमित करावीत व घरांच्या नोंदी कराव्यात. तसेच सिटी सर्व्हेला घरे नोंदवावीत या मागणीसाठी शिखर शिंगणापूर येथील ग्रामस्थांनी दहिवडी येथे उपोषण केले. दरम्यान, गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.शिखर शिंगणापूर येथे गावठाणामध्ये तसेच गायरानामध्ये अनेकांनी घरे बांधली आहेत. प्रत्येकाने पाच ते सहा लाख रुपये खर्चही घरासाठी केला आहे. संबंधित सर्व घरांच्या नोंदणी ग्रामपंचायत दप्तरी कराव्यात व भूमि अभिलेख कार्यालयातून सिटीसव्र्व्हेची नोंद करून द्यावी, अशी मागणी करत शिखर शिंगणापूर येथील वीरभद्र कावडे, अतुल करचे, सुनील ठोंबरे, सोमनाथ काटकर, अनिल करचे, बाळू करचे यांच्यासह अनेक महिला व ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. या उपोषणाची दखल घेत गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी शिखर शिंगणापूरचे ग्रामसेवक रामचंद्र गौंड व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!