महत्त्वाच्या बातम्या

सातारा तालुका पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचे स्वागत

     नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची सातारा तालुुका पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेवून त्यांचे स्वागत केले. यावेळी सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम, उपाध्यक्ष विजय जाधवसुनिल साबळे सचिव राहुल ताटे, सदस्य संतोष यादव, निलेश साबळे, बाळू मोरे, सोमनाथ राऊत, मिलिंद लोहार, प्रशांत संकुडे उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत कायदा व सुव्यवस्था तसेच घरफोड्या याबाबत पत्रकार संघाच्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी उत्तरे दिली. 
        ते म्हणाले, सध्या पोलीस प्रशासनावर सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या ज्ञानेश्वर माऊली पालखी बंदोबस्ताचा ताण आहे. परंतू येत्या  काही दिवसातच वाढत्या घरफोडी विषयी विशेष ग्रामसभा घेवून लोकजागृती करणार आहे. यावेळी त्यांनी त्यांचा जीवनपट उलघडून सांगितला तसेच सेवाकाळात आलेले अनुभव कथन केले. सातारा तालुका पत्रकार संघास पोलीस प्रशासनाचे सर्वोतोपरी सहाय्य राहील असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!