महत्त्वाच्या बातम्या

कृत्रिम बुद्धिमत्तेतून समाजभान आणि कृतीतून ज्ञान

सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय खंडाळा बीसीए व कौशल्य विकास विभाग आणि AI गुरुजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी AI आंतरराष्ट्रीय लॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी,भारत प्रताप पवार,खंडाळा विभाग शिक्षण समिती सचिव अनिरुद्ध शंकरराव गाढवे,प्राचार्य शब्बीर नालबंद यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी प्राचार्य डॉ हणमंत जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक व उद्देश सांगताना कौशल्य विकास विभागप्रमुख प्रा. अमीर इनामदार म्हणाले- “खंडाळा विभाग शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी शंकरराव गाढवे यांच्या दूरदृष्टीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तराचे प्रात्यक्षिक ज्ञान व जीवन कौशल्य मिळावीत या उद्देशाने १५ ऑगस्ट २०२४ रोजी लॅब स्थापना झाली.याद्वारे शालेय विद्यार्थ्यांना AI ज्ञान मिळत आहे, यासोबत महाविद्यालय विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात करिअर वाटा उपलब्ध व्हाव्यात आणि प्रकल्प अभ्यासाद्वारे विद्यार्थी कौशल्य परिपूर्ण व्हावा यासाठी सामंजस्य करार होत आहे.”
प्रताप पवार म्हणाले-“AI लॅब भारत, नायजेरिया,केनिया इ.देशात स्थापित असून शालेय विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानद्वारे समाजभान आणि कृतीतून ज्ञान देणे असा उद्देश आहे. सामंजस्य करारातून महाविद्यालय विद्यार्थी लॅबशी जोडला जाईल यासोबत कल्पक प्रकल्प कौशल्य व करिअर संधी प्राप्त करेल असा विश्वास व्यक्त केला. “
अनिरुद्ध गाढवे म्हणाले- “भविष्यातील शैक्षणिक परिवर्तन संधी ओळखून वर्तमान पुरेशा कौशल्य संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राजेंद्र विद्यालय संकुलात AI लॅब ची स्थापना करण्यात आली, कराराद्वारे सर्व शाखा विद्यार्थ्यांना लाभ घेता यावे अशी मौलिक सूचना केली.” 
प्रा. वर्षा गाढवे,प्रा.काजल पाटील यांनी परिश्रम घेतले, प्रा. भारती चव्हाण यांनी आभार मानले.
यावेळी राजेंद्र विद्यालय AI लॅब समन्वयिका पूजा चौधरी,उपप्राचार्य डॉ. प्रतिभा पाटणे,महाविद्यालय नॅक समन्वयक स्नेहल शिंदे सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!