वाघमोडेवाडी व पिंगळी बुद्रुक येथून शेळ्या चोरीला
दहिवडी: माण तालुक्यातील वाघमोडेवाडी व कोकरेवाडी (पिंगळी बुद्रुक) येथून अज्ञात चोरट्यांनी एका घरासमोरून शेळ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील गोठ्यातून ३३ हजार रुपये किमंतीच्या चोरून नेल्या आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दहिवडी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दि. २० जुलै रोजी मध्यरात्री वाघमोडेवाडी येथील चैतन्य सुभाष मडके यांचे पाहुणे माधवराव कोंडी कोकरे रा कोकरेवाडी पिंगळी बुद्रुक यांच्या घरासमोरील उघड्या गोठ्यातून ३३ हजार रुपये किमंतीच्या ४ मोठ्या शेळ्या व तीन लहान करडे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घरासमोरील गोठ्यातून काही शेळ्या चोरून नेल्या. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
चोरीची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करत अधिक तपास सुरू केला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची एक टीम तयार करण्यात आली असून, परिसरातील cctv फुटेज तपासले जात आहेत. लवकरच चोरांना पकडण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार व्ही एच खाडे , पोलिस हवालदार आर.पी.खाडे करत आहेत.
