महत्त्वाच्या बातम्या

चुलतीला आय लव यू म्हटल्याच्या वादातून एकाचा खून; चंदननगर परिसरात आढळला मृतदेह

     पुण्यातील चंदननगर परिसरातील आंबेडकर वसाहतीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चुलतीला आय लव यू म्हणल्याच्या रागातून एकाला लाथा बुक्य्यांनी व हॉकी स्टिकने मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव असे या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना 12 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. चंदन नगर परिसरात बेवारस मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा मृतदेह साईनाथ उर्फ खलीबली जानराव (वय 35) याचा  असून त्याला दारूचे व्यसन होते असे तपासा दरम्यान समोर आले.       

        या प्रकरणामध्ये सोन्या उर्फ आदित्य संतोष वालेकर (वय 21) आणि समर्थ उर्फ पप्पू करण शर्मा (वय 22) या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोन्या उर्फ आदित्य संतोष वालेकर यांच्या चुलतीची साईनाथ याने छेड काढली होती. याच्याच रागातून आदित्य व समर्थ शर्मा या दोघांनी मिळून साईनाथला बेदम मारहाण केली. या मारहाणी मध्ये साईनाथ हा गंभीर जखमी झाला त्यानंतर सोन्या याने पोलिसांना फोन करून एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण  कक्षाला दिली. तपासादरम्यान आदित्य संतोष वालेकर व समर्थ शर्मा यांनी साईनाथचा खून केल्याचे उघड झाले आहे. साईनाथचा मृतदेह हा ससून रुग्णालयामध्ये पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!