महत्त्वाच्या बातम्या

घरकुलावरती ना.जयकुमार गोरे, देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्याचा  संकल्प

दहिवडी: माण तालुक्यातील आंधळी गावचे आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत मधील सर्वच घरकुलावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा फोटो लावण्याचा निर्धार केला आहे. जयकुमार गोरे हे ग्रामविकास खात्याचे मंत्री झाल्यापासून अनेक क्रांतिकारी निर्णय या महाराष्ट्रामध्ये घेण्यात आले आहेत. त्यामध्येच महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू व्यक्तीला आपल्या हक्काचा निवारा मिळावा म्हणून मागेल त्याला घरकुल देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला.

      संपूर्ण महाराष्ट्र मध्ये दहा लाखापेक्षा जास्त घरकुले बांधून तयार झाली आहेत. त्यामधील सातारा जिल्ह्यामधील माण तालुक्यातील आंधळी गावामध्ये आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांनी ६१ घरकुलांना मंजुरी देऊन सध्या ते पूर्णत्वाकडे जात आहेत. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये इतकी घरकुले कोणत्याच सरकारच्या काळामध्ये मिळाळी नाहीत. भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सर्वसामान्यांसाठी देवदूत बनून राहिले आहेत. म्हणूनच आंधळी ग्रामपंचायत मधील घरकुलधारक नागरिकांनी देवेंद्र फडणवीस जयकुमार गोरे यांचा घरकुला वरती फोटो लावण्याचा निर्धार करून त्यांचा सन्मान करण्याचे ठरविले आहे. या निर्णयामुळे आंधळे ग्रामपंचायततीचा राज्यात डंका आहे.

 आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांची आंधळी ग्रामपंचायत राज्यात पहिलीच

       सरपंच दादासाहेब काळे यांनी हा अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतला असून सर्वसामान्यांचे देवदुत असणारे देवेंद्र फडणवीस व जयकुमार गोरे यांचा घरकुलावरती फोटो लावण्याचा निर्धार करणाऱी आंधळी ग्रामपंचायत ही राज्यातील पहिलीच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!