महत्त्वाच्या बातम्या

कधी पोहोचणार ग्रामरोजगार….सहाय्यकांच्या व्यथा सरकार दरबारी

दहिवडी: महात्मा गांधी नरेगाचे गाव पातळीवर चांगले काम करण्यासाठी राज्य सरकारने ग्रामरोजगार सहायक यांची निवड केली असून, त्याप्रमाणे आजपर्यंत खऱ्या अर्थाने ग्रामरोजगार सहायकांनी अत्यंत चांगले काम करून राज्याची मान उंचावली आहे. परंतु कोणतेही मासिक वेतन किंवा मानधन नसल्या कारणाने रोजगार सेवक प्रचंड आर्थिक संकटात आहे.

        महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ पासून रुपये ८,००० मानधन प्रवास भत्ता, प्रोत्साहन भत्ता व इतर सुविधा देण्याबाबत परिपत्रक जारी केले होते. परंतु ते अद्याप लागू न केल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहायक विकास संघटनेच्या वतीने माण तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने दि. १५ सप्टेंबर २०२५ पासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

      या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामरोजगार सहायकांना पूर्ण वेळ शासन निर्णय काढावा व कायम सेवेत घ्यावे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही स्वतंत्र यंत्रणा म्हणून मान्यता द्यावी. तीन ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या ‘जीआर’ची अंमलबजावणी करावी. सदर निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती माण व तहसीलदार माण यांना देण्यात आले यावेळी माण तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष राहुल पाठक उपाध्यक्ष दादा पिसाळ कार्याध्यक्ष रवी कुंभार,सचिव नारायण सुर्यवंशी (दादा पाटील),सहसचिव छत्रपती भोसले, खजिनदार रामचंद्र जगदाळे , बाबा साठे जनार्दन खरात, राजेंद्र टकले, भाऊसो सरतापे आदी उपस्थित होते

शासनाच्या वतीने देण्यात येणारे सर्व लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारे राज्यामध्ये 28000 ग्रामरोजगार सहाय्यक काम करीत आहेत त्यांच्या मानधनाचा विषय त्वरित मार्गी लावावा अन्यथा भविष्यात ही तीव्र स्वरूपाची आंदोलन करण्याची वेळ आली तरी ते सुद्धा करू अशी प्रतिक्रिया राहूल पाठक 

अध्यक्ष ग्रामरोजगार सहाय्यक संघटना माण यांनी व्यक्त केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!