पै. गणेश गोरेंची पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या सातारा जिल्हा सचिवपदी निवड
दहिवडी येथील राष्ट्रीय कुस्तीगीर पैलवान गणेश किसन गोरे यांची ॲम्यूचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन सातारा जिल्हा संघटनेचे सचिवपदी निवड करण्यात आली आहे. माण तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष, बॅडमिंटन कोच, क्रीडा मार्गदर्शक म्हणून सध्या कार्यरत असलेले गणेश गोरे सर यांची सातारा जिल्हा सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष सातारा जिल्ह्यामध्ये पावर लिफ्टिंग या खेळाचा प्रचार आणि प्रसार या संघटनेमार्फत केला जात आहे. आतापर्यंत अनेक राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू या जिल्ह्यातून निर्माण झाल्या तसेच अनेक शिवछत्रपती पुरस्कार देखील मिळाले आहेत.
पावर लिफ्टिंग घ्या खेळायला केंद्रीय क्रीडा मंत्रालय ची मान्यता असून, 5% नोकरी आरक्षण तसेच शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र असणारा हा खेळ, शालेय क्रीडा स्पर्धेत देखील समाविष्ट आहे.
गणेश गोरे हे अनेक वर्ष क्रीडा क्षेत्रात कार्यरत असून, स्वतः खेळाडू असल्यामुळे तसेच खेळाडूंना सहकार्य करणे मार्गदर्शन करणे व खेळाच्या प्रत्येक चळवळीत उभा राहणे हे त्यांचे गुण वैशिष्ट्य आहे. त्यांचे क्रीडा कार्याची तळमळ बघून त्यांना हे पद देण्यात आले आहे. ॲम्यूचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन सातारा जिल्हा आध्यक्ष प्रा पै अमोल साठे यांचेवतीने हे निवड पत्र त्यांना सन्मान पूर्वक देण्यात आले.
उपाध्यक्ष मा अरुण (दादा) देशमुख कराड आणि सर्व सदस्य यांनी गणेश गोरे सर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
गणेश गोरे यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच माण तालुका कुस्तीगीर संघांचे आध्यक्ष मा दादासाहेब काळे यांनी देखील अभिनंदन केले. गणेश सर यांच्या या कार्याची तसेच त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
