महत्त्वाच्या बातम्या

जागृत राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन, मेंढोशी, चाफळ आणि तारळे येथे शंभूराज देसाई यांचा जाहीर संवाद मेळावा संपन्न

पाटण दि. २५  –  २०२४ साठी शिवसेना पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बुधवारपासून पाटण विधानसभा मतदारसंघात शंभूराज देसाई यांच्या जाहीर संवाद मेळाव्यास सुरुवात झाली. शुक्रवारी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या प्रचंड उपस्थितीत म्हावशी येथी मेंढोशी, तर श्रीरामाच्या चाफळ नगरीत आणि तारळे विभागात शंभूराज देसाई यांचा जाहीर संवाद मेळावे संपन्न झाले. या संवाद मेळाव्याअगोदर पाटण विधानसभा मतदरासंघातील सदाभाऊ खोत आणि कवाडे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शंभूराज देसाई यांची भेट घेवून आपला पाठींबा जाहीर केला. गेल्या पाच वर्षात पाटण विधानसभा मतदारसंघात सांस्कृतिक भवन उभारले, पोलिस स्टेशनची नवीन इमारत बांधले, कृषी संकुलासह कृषी प्रशिक्षण केंद्र उभारले, या विकासकामांची माहिती देत आगामी निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन शंभूराज देसाई यांनी मतदारांना यावेळी केले. पाटण तालुक्याचा चेहरा मोहरा बदलल्याचे काम शंभूराज देसाई यांनी केले आहे. तसेच ४ वर्ष ११ महिन्यात विविध विकासकामे शंभूराज देसाई यांनी केली आहेत. या सर्व ठिकाणी देसाई यांचा शाल आणि श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. धरणातील १०० मीटर पाणी उचलून ते मेंढोशी गावाला देत गावात नळपाणी पुरवठा योजना राबवली. त्याचप्रमाणे पाटण येथील गगनगिरी महाराजांच्या मंदिरासाठी एक कोटी रुपयांची मदत केली. २०१९ ते २०२४ या कालावधीत केलेली विविध विकासकामे मतदारांपर्यंत पोहचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. असे शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी सांगितले.
सरकारच्या विविध सरकारी योजनांचा लाभ मेंढोशी, चाफळ, तारळे या गणांना मिळाल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले. तसेच विरोधकांना आपल्या विकासकामांतू उत्तर द्यायचे, असे मत शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केले. २१ वर्षाच्या संघर्षानंतर २०१४ ते २०१९ आमदार आणि २०१९ ते २०२४ मंत्री असून सुद्धा माझे पाय जमिनीवर असल्याचे शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले. २०२४ ला क्रांतिकारी विजय मिळवण्याचा निर्धार आजच्या चाफळ मेळाव्यात करण्यात आला. तसेच तारळे विभागातील जाहिर मेळाव्यात यंदा विजयाची हॅट्रीक साध्य करण्याचा संकल्प घेण्यात आला.
पाटण विधानसभा मतदारसंघातील म्हावशी विभागातील मेंढोशी येथे शुक्रवारी शंभूराज देसाई यांचा जाहीर संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दादा जाधव, विलास खुराडे, सुरेश जाधव, बापूराव सावंत, पी.डी. घाडगे, तुकाराम मोळावडे, शंकर पाटील, अमोल जगताप, बाळासाहेब पाटील मधुकर भिसे, जयवंत घाडगे, अजिंक्य मोळावडे, वाय.के. जाधव यांच्यासह भागातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी विधानसभा निवडणुकीत शंभूराज देसाई यांना म्हावशी विभागामधून विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. तारळे येथील जाहीर मेळाव्यात बोलताना शंभूराज देसाई यांनी सोमवारी आपण अर्ज दाखल करणार असल्याचे सुतोवाच केले. तसेच कार्यकर्त्यांनी जागृत राहून जास्तीत जास्त मताधिक्यांनी २०२४ चा विजय साजरा करण्याचे आवाहन उपस्थित मतदारांना याप्रसंगी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!