महत्त्वाच्या बातम्या

लाचलुचपतच्या जाळ्यात प्रधान तंत्रज्ञ…दहिवडीत कारवाई ; विद्युत वितरणला शाॅक

दहिवडी: सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहिवडी येथे केलेल्या कारवाईत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीतच्या दहीवडी शाखेतील राहुल अंगदराव महालिंगे (वय – ४५ वर्षे, व्यवसाय – प्रधान तंत्रज्ञ (लाईनमन) वर्ग – ३) जाळ्यात सापडला. या कारवाईमुळे विद्युत वितरण कंपनीला जोरात शाॅक बसला आहे.

 

        याबाबतची माहिती अशी लोकसेवक आरोपी राहुल महालिंगे यांने तक्रारदाराकडे ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी नवीन व्यावसायिक विद्युत कनेक्शन जोडण्याकरीता ५,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. आज रोजी सापळा कारवाई दरम्यान ५,०००/- रूपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुनिल दाजी पाटील, पोलिस हवालदार गणेश ताटे व निलेश राजपुरे, पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ शिंदे व सत्यम थोरात, चालक पोलिस पुजारी यांच्या पथकाने केली. तपासी अधिकारी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग साताराच्या पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे काम पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!