पुण्यात सापडलं बॉम्ब बनवण्याचं साहित्य…. लोकांमध्ये भीतीचे वातावरण
पुणे: दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर मुंबई, पुणे आणि इतर भागातील काही महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षा वाढवण्यात आल्या होत्या. काही संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आले होते. त्यातच आता पुण्यातील विश्रांतवाडी – टिंगरेनगर भागात बॉम्ब बनवण्यासाठी उपयोगी असणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या वायर असे साहित्य सापडले. या घटनेमुळे विश्रांतवाडीतील नागरिकांमध्ये खळबळ जनक परिस्थिती निर्माण झाली आहे.विश्रांतवाडीतील विद्यानगर गल्ली नंबर 8 साईकृपा लॉज जवळ या सर्व वस्तू सापडल्या वेळ न घालवता स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती देऊन बोलावण्यात आले. रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे साहित्य 2 सफाईकामगारांच्या निदर्शनास आले. खडी फोडणाऱ्या कामगारांकडे हे साहित्य मिळाले आहे. त्यांना खडी फोडण्यासाठी जिलेटिनच्या कांड्या वापरात येतात अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी दोन मजुरांच्या विरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सफाई कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस व बॉम्ब नाशक पथक देखील घटनास्थळी पोहोचले व डीटोनेटर व जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या.
