महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत इमारतीमध्ये लागली आग…अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

   मुंबईच्या दहिसर मधून एका घराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. दहिसर पूर्वेतील आनंदनगर परिसरामध्ये आज एका इमारतीमध्ये मोठी आग लागली. त्यानंतर लगेचच महापालिका प्रशासनाने घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवल्या. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र इमारतीमधलं घर जळून खाक झालं आहे.

       ही घटना आनंद नगर परिसरातील सब्जी मार्केट समोर असलेल्या इमारतीच्या पहिला मजल्यावर घडली. घटनेची माहिती मिळतच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दहिसरमधील या आगीच्या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी अधिक तपास दहिसर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!