महत्त्वाच्या बातम्या

मुठा नदी स्वच्छतेसाठी पुणे करणार नदी महोत्सवाचे आयोजन

      राज्यातील तसेच देशातील नद्यांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे  प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे नद्या देखील अत्यंत प्रदूषित झाल्या आहेत. पुण्यातील  मुठा नदीचे देखील प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे नदी आठवडा आणि राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त पुणे महानगरपालिका 2 डिसेंबर रोजी मुठा नदीच्या पात्रामध्ये नदी महोत्सव 2025  ‘स्वच्छ नदी सुंदर पुणे’ या नावाने नदी स्वच्छता मोहीम आयोजित करणार आहे.
      पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम म्हणाले की, हा महोत्सव शहराचा वाढत्या पर्यावरणीय प्रतिबद्धतेचे प्रतिबिंब आहे. आमचे उद्दिष्ट नागरिकांना मुठा नदीच्या जवळ आणणे आणि तिच्या स्वच्छतेसाठी सामूहिक जबाबदारीची प्रेरणा देणे आहे.असे सांगून त्यांनी पुणेकरांना या उपक्रमात सामील होण्याचे आवाहन केले. स्वच्छ नदी म्हणजे निरोगी आणि अधिक सुंदर पुणे एकत्रितपणे आपण आपली जीवन रेखा पुनरुज्जीवीत करू शकतो.
      वाढत्या औद्योगीकरणामुळे कारखान्यांमुळे दूषित घटक पाण्यात सोडले जातात त्यामुळे नद्या प्रदूषित होऊ लागल्या आहेत. अनेक ठिकाणी नद्यांमध्ये कचरा, निर्माल्य सोडले जाते. त्यामुळे या नद्या स्वच्छ करण्यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे. सकाळी 7 ते 10 या वेळेत भिडे पूल ते म्हात्रे पूल दरम्यान ही मोहीम चालेल. ज्यामध्ये विद्यार्थी, स्वयंसेवक,  पर्यावरण प्रेमी, नागरिक यांचा सहभाग अपेक्षित आहे. हा कार्यक्रम YUVA फॉर ॲक्शन, इकोसन, सर्विसेस फाउंडेशन, जीवित नदी, लिविंग रिवर फाउंडेशन आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आयोजित केला आहे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत
 ही मोहीम व्यवस्थितपणे पार पाडावी यासाठी संपूर्ण नदीकाठचा भाग व्यवस्थित स्वच्छतेसाठी 9 झोनमध्ये विभागीत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रवेश बिंदूवर पोहोचल्यानंतर सहभागी झालेल्या सर्वांना त्यांच्या नियुक्त झोनमध्ये मार्गदर्शन देखील केले जाणार आहे.  झोन 1,2 आणि 3  बाबा भिडे पुलावरून प्रवेश मिळणार आहे. झोन 4,5,6 यांना खुडे पथ येथून प्रवेश मिळणार आहे. नदी स्वच्छतेसाठी सर्वांना प्रत्येक झोनमध्ये पीएमसी कडून मास्क आणि पुरवले जाणार आहेत तसेच स्वयंसेवकांना  नदीत न उतरण्याचा सल्ला देण्यात आला आहे तसेच  बॅरिगेड केलेल्या भागात प्रवेश करण्यास देखील मनाई केली आहे.
नदीचे नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी, पुनरुज्जित करण्यासाठी पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी व पर्यावरणाचे आरोग्य वाढवण्यासाठी नागरिकांना त्यांचा वेळ देण्याचे आव्हान पीएमसीने केले आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. नदीभागचा परिसर हिरवागार करण्यासाठी या कार्यक्रमादरम्यान रोपे देखील वाटली जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!