महत्त्वाच्या बातम्या

आंधळीत डीजे कायमचा बंद ; सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक निर्णय 

दहिवडी: सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या मिरवणूकीतील डिजे यापुढे आंधळी गावाच्या हद्दीत बंदी घालण्याचा ऐतिहासिक ठराव ग्रामसभेत पारित करण्यात आला. ध्वनी प्रदुषण, मर्यादा ओलांडून कर्णकर्कश आवाज, शारीरिक आणि मानसिक घातक दुष्परिणाम, नाचत अश्लील केले जाणारे हावभाव, वादावादी यामुळे डिजेचा आवाज धोकादायक ठरू लागला आहे. सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या मिरवणूकीतील डिजे यापुढे आंधळी गावाच्या हद्दीत बंदी घालण्याचा ऐतिहासिक ठराव ग्रामसभेत पारित करण्यात आला. याच ठरावाची कायदेशीर अंमलबजावणी करण्यासाठी दहिवडी पोलीस स्टेशनची कायमस्वरूपी सहकार्य मिळावे, अशी ग्रामपंचायतीने विनंती करत हा ठराव कायदेशीर चौकटीत बसवून काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच दादासाहेब काळे यांनी सांगितले.

        जगभर डिजिटल युगात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात आमुलाग्र परिवर्तन होत असून प्रत्येकाला त्यासोबत राहावे लागणार आहे. यासाठी आंधळी ग्रामपंचायतीने शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम हाती घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळेचा सर्वांगीण विकास करत सातारा जिल्हात सर्वोत्कृष्ट प्रगती करत दुसऱ्या क्रमांकाचा लौकिक पटकाविला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ७ घटक विषयांवर स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात अग्रेसर राहून आता गावातील वेळोवेळी वातावरण बिघडणाऱ्या डिजे वाजविण्यास बंदी घालण्याचा विषय ग्रामसभेसमोर अनेकांनी चर्चेत आणला. यावर डिजे चा आवाजाने सामाजिक वातावरण बिघडत असून होणारे घातक दुष्परिणाम यावर साधकबाधक चर्चा झाली. अखेर सर्वानुमते आंधळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोणत्याही कार्यक्रमात डिजे वाजविण्यास बंदी घालण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी दहिवडी पोलीसांनी सहकार्य करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता आंधळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत डीजेला कायम नो एंट्री असणार आहे.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान काळात आंधळी ग्रामपंचायतीचा डिजे बंदीचा अभिनव निर्णय माण तालुक्यात चर्चेत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!