”आरोग्य सेवा हीच वाढदिवसाची भेट! २६ डिसेंबरला दहिवडीत तज्ज्ञ डॉक्टरांचा फौजफाटा”
दहिवडी: शिवसेना जिल्हाप्रमुख (सातारा) मा. श्री. चंद्रकांत (दादा) जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, ‘धर्मवीर आरोग्याचा महायज्ञ’ या उपक्रमांतर्गत शुक्रवारी, २६ डिसेंबर २०२५ रोजी दहिवाडी येथे भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर धर्मवीर प्रतिष्ठान कुस्ती संकुल (माण तालुका) आणि सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (मिरज) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि मोफत सुविधा:
या शिबिरात नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार असून खालील सुविधा मोफत पुरवल्या जातील:
तपासणी: ईसीजी (ECG), डोळे तपासणी, हृदयदोग तपासणी, हाडांच्या तपासणीसह कान-नाक-घसा आणि दात तपासणी.
मोफत शस्त्रक्रिया: मूत्रखड्याचे ऑपरेशन, एन्जोओग्राफी, एन्जोप्लास्टी आणि बायपास सर्जरी यांसारख्या मोठ्या शस्त्रक्रियांची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उपस्थित तज्ज्ञ डॉक्टर:
या शिबिरात डॉ. सुरेश पाटील (हाडांचे तज्ज्ञ), डॉ. समृद्धी देसाई (हृदय तज्ज्ञ), डॉ. तुषार थोपाडे (हार्ट सर्जन), डॉ. श्रीनाथ पाटील (युरॉलॉजी), डॉ. राहुल चडा (ई.एन.टी.) आणि डॉ. राजकुमार खंबे (लिव्हर तज्ज्ञ) यांसारखे अनुभवी डॉक्टर रुग्णांची तपासणी करतील.
शिबिराचा तपशील:
दिनांक: शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५
वेळ: सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत
ठिकाण: बालाजी मंगल कार्यालय, भटकी मळा रोड, दहिवडी.
नोंदणी व संपर्क:
ज्या रुग्णांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी तात्काळ ७७७५९५९५२२ या व्हॉट्सॲप नंबरवर आपले नाव आणि मोबाईल नंबर पाठवून नोंदणी करावी. आज (२६ डिसेंबर) थेट शिबिराच्या ठिकाणी नोंदणी करणाऱ्या रुग्णांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल, असे आयोजकांमार्फत कळवण्यात आले आहे.
या शिबिराचे आयोजन शिवसेना पदाधिकारी व माण-खटाव-फलटण-माळशिरस तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी केले आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
