महत्त्वाच्या बातम्या

शनी देवस्थान ट्रस्ट, सोळशी तर्फे गरीब, शनी भक्तांना दिवाळी किटचे वाटप

पिंपोडे बुद्रुक- तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान ट्रस्ट, सोळशी ता.कोरेगाव  यांच्यामार्फत वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या सामाजिक उपक्रमामधील चातुर्मासातील सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे दीपावली सणानिमित्त गोरगरीब, होतकरू गरजू मुलांना आणि शनी भक्तांना संपूर्ण पोशाख, रवा, साखर, तेल, रोख रक्कम वाटप. गरीब मुलांना कपडे, फटाके, आकाश कंदिल भेट म्हणून देण्यात येतात.
       मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज आणि शिवसह्याद्री पतपेढीचे चेअरमन भाई वांगडे, त्यांचे सहकारी संदीप राऊत, पुणे येथील उद्योजक अंकुश जाधव आदी मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन देवस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कलियुगामध्ये दानाला फार महत्त्व आहे आणि हे दान सतपात्री असणे महत्त्वाचे आहे. दीपावली सणानिमित्त श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सेवेकरी आणि गरीब होतकरूभाविकांना मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज, भाई वांगडे, संदीप राऊत, सेवेकरी मंडळाचे अध्यक्ष हनुमंत वाघ, अविनाश धुमाळ, अमोल निकम, गिरीश पवार, नरेंद्र बाबर, विजय पवार, अविनाश धायगुडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिवाळी किट वाटप करण्यात आले.सामान्य माणसाने देखील आपल्या क्षमतेनुसार पशु पक्ष्यांना चारा, धान्य, पाणी याचे दान करावे तसेच आपल्या सभोवतालच्या गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार दान करावे. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन दीपावली खऱ्या अर्थाने गोड करावी, असा संदेश शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी यावेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!