महत्त्वाच्या बातम्या

सरकारची भूमिका अत्यंत कठोर’; सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर अभिजित दीपकेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली :
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका अधिक तीव्र होत आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी‘चे संस्थापक अभिजित दीपके यांनी सरकारवर गंभीर आरोप करत, आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचे म्हटले आहे.

अभिजित दीपके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, सरकार आंदोलकांच्या मागण्यांवर कोणताही संवाद साधण्यास तयार नसल्याचा आरोप केला. त्यांनी सरकारची भूमिका “अत्यंत कठोर” असल्याचे म्हणत, इतक्या दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणानंतरही ठोस पाऊल न उचलल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला विविध क्षेत्रांतील व्यक्ती, सामाजिक संघटना आणि काही राजकीय नेत्यांकडून पाठिंबा मिळत आहे. उपोषणादरम्यान वांगचुक यांनी समर्थकांना आंदोलन अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले असून, सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.

वांगचुक यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात सरकारची भूमिका काय असणार आणि आंदोलनाबाबत पुढे कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!