महत्त्वाच्या बातम्या

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत उच्च न्यायालय गंभीर; तातडीने उपचारांचे निर्देश

नवी दिल्ली: दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांच्या ताब्यात असलेले प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून खूप मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने मंगळवारी एका महत्त्वपूर्ण सुनावणीदरम्यान सोनम वांगचुक यांना सरकारी सफदरजंग रुग्णालयातून तातडीने मेदांता या नामांकित खाजगी रुग्णालयात हलवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. वांगचुक यांच्या ढासळत्या प्रकृतीची गंभीर दखल घेत, त्यांच्या आरोग्याकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करून चालणार नाही, अशी कडक टिप्पणी उच्च न्यायालयाने केली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सविस्तर ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिल्यामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का मानला जात आहे.

दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात झालेल्या आंदोलनानंतर सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आले होते, ज्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, योग्य आणि वैद्यकीय उपचारांच्या गरजेपोटी त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात यावे, अशी याचिका न्यायालयात सादर करण्यात आली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने स्पष्ट केले की, रुग्णाची वैद्यकीय सुरक्षा आणि उत्तम उपचार ही पहिली प्राथमिकता असायला हवी. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता सोनम वांगचुक यांच्यावर खाजगी रुग्णालयात वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केले जाणार आहेत.

दरम्यान, दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार आणि सोनम वांगचुक यांना दिलेल्या वागणुकीवरून आधीच राजकीय वातावरण तापलेले आहे. जंतर-मंतरवर विविध विरोधी पक्षांचे नेते आंदोलकांच्या पाठीशी उभे ठाकले असताना, उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रशासनावर आणि पोलिसांच्या कारवाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वांगचुक यांना मेडांता रुग्णालयात हलवण्याच्या या आदेशामुळे त्यांच्या समर्थक आणि आंदोलकांमध्ये मोठा दिलासा व्यक्त केला जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!