महत्त्वाच्या बातम्या

विमान कंपन्यांना आलेल्या बॉम्बच्या धमक्यांमागे जगदीश उईके…

        गेल्या महिन्यापासून  इंडिगो व आकासा कंपन्यांच्या विमानात बॉम्ब ठेवल्याच्या वारंवार धमक्या येत होत्या. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या आणि  बॉम्ब  च्या धमकीची माहिती मिळताच या त्याबाबत सुरक्षा यंत्रणे कडून तपास सुरू करण्यात आला. तपासा दरम्यान फसव्या बॉम्बच्या धमक्यांप्रकरणी जगदीश श्रीराम उईके या व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. याच्या नावावर 354 हुण अधिक फसवे मेल्स पाठवल्याचा आरोप आहे.

     जगदीश उईके हा एक लेखक आहे. तो पूर्व महाराष्ट्रातील  माओवाद ग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावचा आहे.नागपूरच्या  पोलीस आयुक्त लोहित मतानींनी  टीओआयला सांगितले की, तो ‘आतंकवाद- एक तुफानी राक्षस’ या दहशतवादावरील पुस्तकाचा लेखक आहे. त्याने अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले असून त्याच्या या पुस्तकातून दहशतवाद विषयीची गुप्त माहिती मिळते जी आजवर कोणीही पुढे आणलेली नाही. पोलीस आयुक्त रवींदर सिंगल यांनी सांगितले की उईकेच्या प्रेरणा वास्तविक दहशतवादाशी जोडलेल्या नसून त्याने केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला स्टंट होता .

       आपल्या पुस्तक प्रकाशनासाठी तो वारंवार पंतप्रधान कार्यालय व इतरांकडे पाठपुरावा करीत होता परंतु त्याचा काही उपयोग न झाल्याने त्यांनी फसवे मेल्स पाठवण्यास सुरुवात केली. त्याने फक्त देशातील विमान, रेल्वेच नव्हे तर पीएमओ कार्यालय, उच्च सरकारी अधिकारी आणि विविध अस्थापनांना देखील धमक्या  दिल्या आहेत. यात प्रामुख्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच इतर राजकीय अधिकाऱ्यांचा समावेश होतो. उईकेने नवीन ईमेल मधून भारतातील स्लीपर सेल्सच्या कार्याविषयी इशारा दिला होता. पोलिसांकडून याची 2021 मध्ये दोनदा चौकशी झाली होती. त्यानंतर तो दिल्लीला गेला व तेथून  नवीन धमकीचे मेल केले. दिल्लीहून  परतल्यानंतर त्याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

     पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या नेतृत्वाखालील अन्वेषकांनी त्याचा शोध घेतला.  त्याच्या डिजिटल ऍक्टिव्हिटीज आणि  कम्युनिकेशन पॅटर्नची चौकशी सध्या सुरू आहे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे कॉल रेकॉर्ड, ई-मेल्स, लॅपटॉप, बँक खाते आणि  आर्थिक ट्रेल याविषयीचे तपास सुरू असून त्याला सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे व त्याच्या कोठडीत वाढ होण्याची देखील  शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!