महत्त्वाच्या बातम्या

सौ.वेदांतिकाराजे भोसले यांचा प्रभाग १६ मधील मतदारांशी संवाद मेळावा संपन्न

        आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी सौ.वेदांतिका राजे भोसले यांनी प्रभाग सोळा मधील मोरे कॉलनी मधील आनंदवन अपार्टमेंट येथे मतदारांचा संवाद मेळावा आयोजित केला होता. यावेळी त्यांनी या प्रभागातील समस्या जाणून घेतल्या.आनंदवन अपार्टमेंटच्या वतीने ॲड. वैभव मोरे यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी बोलताना वेंदातीकाराजे भोसले यांनी सांगितले की,बाबा महाराजांनी विकासाचा डोंगर उभा केला. यामध्ये प्रामुख्याने सातारा मधील अंतर्गत रस्ते तसेच सातारा मधून बाहेर पडणारे रस्ते यांचे डांबरीकरण त्याचबरोबर कास व मुनावळे येथील पर्यटन स्थळाचा विकास, कास धरणाची उंची वाढवणे, त्याचबरोबर मेडिकल कॉलेज मंजुरी आणि सैनिक स्कूल नूतनीकरणासाठी साठी 400 कोटीचा निधी मंजूर करून दिला.

     सातारा येथे सुरू झालेल्या शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली. त्याचबरोबर अद्यावत असे पाचशे खाटांचे रुग्णाला होणार असल्यामुळे रुग्णांना पुणे मुंबई सारखे महागडे उपचार सातारा येथे मोफत उपलब्ध होणार आहे. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना अत्यंत दमदार  कामगिरी करत असुन काही दिवसापूर्वी प्रतापगड सहकारी साखर कारखाना ताब्यात घेऊन तेथील कामगारांचा लोकांच्या रोजगाराचा  प्रश्न मिटवला. तसेच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यातून तयार होणारी 18 मेगावॉट वीज निर्मिती सातारा शहरासाठी वापरली जाते या  सर्व विकास कामाच्या मागे बाबाराजे यांचे नेतृत्व खंबीरपणे कामी येते.
      स्वागत पर भाषणामध्ये बोलताना ॲड. वैभव मोरे यांनी बाबा महाराजांचा सातारचे भावी पालकमंत्रीअसा नामोल्लेख करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. या कार्यक्रमास परिसरातील महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्याच बरोबर गुरु अकॅडमी चे सुनील सर व विद्यार्थ्यांची  विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, कृष्णराव कदम, आनंदराव सावंत, राजेंद्र मोरे, चव्हाण सर व मामा लोखंडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!