महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठांमधील अजब प्रकार –  ऐनवेळी एक राष्ट्रीय चर्चासत्र केले रद्द

        राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधील एक धक्कादायक व अजब प्रकार समोर आला आहे. या विद्यापीठात दिनांक ७ नोव्हेंबर २०२४ ते ८ नो. २०२४ दरम्यान दोन दिवसीय एक ‘राष्ट्रीय चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते. ‘Educational Policy and Development: Evaluation of impact of Overseas Scholarships & other Financial Assistance’ हा या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचा विषय होता. विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून या/कार्यक्रमासंबंधीची कार्यक्रम पत्रिका समाज माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर आणि देशभरात गेलेले होती. देशामधील मान्यवर अभ्यासक , प्राध्यापक व विचारवंत या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सहभागी होणार होते.  

      उद्या कार्यक्रम होणार असता आज दिनांक ६  नोव्हेंबर २०२४  रोजी सर्व आमंत्रिताना अध्यासनाच्या व विद्यापीठाच्या वतीने लेखी  पत्रव्यवहार करून कार्यक्रम रद्द झाल्याचे सांगितले आहे . अशा पद्धतीने ऐण कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर कार्यक्रम रद्द करण्याचे कारण काय ? संबंधित अध्यासन व विद्यापीठाचे कुलगुरू कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत ?  कुठल्या प्रकारची विचारधारा व शक्ती यांना अशा पद्धतीच्या वैचारिक कार्यक्रमांचे भीती वाटत आहे ?  याचा खुलासा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी करावा. कार्यक्रम पत्रिका पाहिल्यास लक्षात येते की यामध्ये उपस्थित असणारे सर्व वक्ते हे आपापल्या विषयातील तज्ज्ञ वक्ती व्यक्ती आहेत आणि त्यांचा केवळ शैक्षणिक क्षेत्राशी संबंध आहे.  असे असताना अशा प्रकारच्या वैचारिक मंथनाची कुणाला भीती वाटत आहे ?  याचा देखील खुलासा झाला पाहिजे. सर्व अभ्यासकांनी  वेगवेगळ्या ठिकाणाहून कार्यक्रमाच्या स्थळी जाण्यासाठी आपले तिकिटे अगोदरच बुक करून ठेवली होती. तसेच अनेक विद्यार्थी या राष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी देखील प्रवासाच्या तयारीमध्ये होते या सर्वांच्या नुकसाना जबाबदार कोण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!