कोपरखैरणे येथे उसळला पाटणवासीयांचा जनसागर…मा. यशराज देसाई (दादा) यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो पाटणवासीयांच्या साक्षीने संवाद मेळावा संपन्न
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे रविवारी पाटणवासीयांचा जनसागर उसळलेला पाहायला मिळाला. मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या विजयाचा निर्धार करण्यासाठी अडीच हजारांहून अधिक पाटणवासीयांची उत्साही उपस्थिती लाभली. या संवाद मेळाव्यास कळस चढवला तो लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा) यांच्या ऊर्जादायी भाषणाने.
रविवारी, १० नोव्हेंबर रोजी कोपरखैरणेमधील शेतकरी समाज हॉलमध्ये मुंबई पाटणवासी रहिवाशी मित्र मंडळाचा संवाद मेळावा मा. यशराज देसाई (दादा) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांनी उपस्थित पाटणवासीयांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी नेहमी संघर्ष केला असून पाटण मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेऊन कार्यरत राहिले आहेत. साहेब संघर्षात डगमगले नाहीत. २१ वर्षे संघर्ष करून विजय खेचून आणणे ही साधी गोष्ट नाही. पण आपला कार्यकर्ताही निडर आहे, मेहनती आहे.
सर्वांनी साहेबांना कायम साथ दिली आहे. त्या बळावरच साहेबांनी आपल्या पाटण मतदारसंघात अनेक विकासकामे केली असून गेल्या पाच वर्षांत तर आपल्या मतदारसंघात मोठी विकासकामे झाली आहेत. त्यामुळे विकास म्हणजे मा. शंभूराज देसाई साहेब हे समीकरण झाले आहे. आमचं, सर्व पाटणवासीयाचं ठरलंय, आता फक्त साहेबच!, अशा शब्दांत मा. यशराज देसाई (दादा) यांनी उपस्थितांमध्ये ऊर्जा निर्माण केली.
यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. नरेंद्रजी पाटील यांच्या धर्मपत्नी मा. डॉ. प्राचीताई पाटील, डी. आर. पाटील, चंद्रकांत चाळके यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुंबईतील पाटणवासी रहिवाशी मित्र मंडळाचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि पाटणवासी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
